Kondhwa Pune Crime News | कोंढव्यातून ४० लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्त ! गावठी कट्टा हस्तगत, घरातून करत होता विक्री

Pune Crime Branch

पुणे : Kondhwa Pune Crime News | कोंढवा येथील भाग्योदयनगर (Bhagyoday Nagar Kondhwa) येथील एका घरातून एम डी या (MD Drug) अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकून ४० लाख रुपयांचा २०२ ग्रॅम एम डी (मॅफेड्रॉन) जप्त केला आहे. त्याचबरोबर या तरुणाकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांकडून शस्त्र जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे. (Kondhwa Pune Crime News)

समीर शरीफ शेख Sameer Sharif Shaikh (वय २२, रा. सय्यद काझी हाईटस, भाग्योदय नगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकचे (Anti-Narcotic Cell Pune) पोलीस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam) व त्यांचे सहकारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना समीर शेख हा घरातून अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सय्यद काझी हाईटस येथील शेख याच्या घरावर छापा घातला. घरझडतीत ४० लाख ४० हजार रुपयांचा २०२ ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ, २५ हजार रुपयांचा गावठी कट्टा, ८० हजारांचा मोबाईल असा ४२ लाख २६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे (PSI Digambar Kokate), पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, उत्तम संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे (Kondhwa Police Station) तपास पथकातील अंमलदार यांनी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed