Kondhwa Pune Crime News | पुणे : कोंढव्यात 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, लॅपटॉप…; गणेशोत्सवाआधीच ATS च्या कारवाईनं मोठी खळबळ; अनधिकृत टेलिफान एक्सचेंज उद्ध्वस्त
दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, दहशतवादी कृत्यास सहाय्यासाठी उभारल्याचा संशय
पुणे : Kondhwa Pune Crime News | बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोध पथकाच्या पुणे युनिटने मिठानगर (Mitha Nagar Kondhwa) येथील अनधिकृत टेलिफान एक्सचेंज उध्वस्त केले. दूरसंचार विभागाचे अधिकारी व पंचाच्या समवेत कोंढवा येथील मिठानगरमधील एम ए काँप्लेक्स येथे हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज होते. या कारवाईत विविध कंपन्याचे ७ सिम बॉक्स, ३७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, सिम बॉक्स चालविण्याकरीता वापरण्यात येणारे अॅन्टीना, सीम बॉक्स कायम कार्यान्वीन्त राहावा, या करीता वापरण्यात येणारे इन्व्हर्टर, लॅपटॉप असा माल जप्त करण्यात आले आहे.
नौशाद अहमद सिद्धीकी (वय ३२) हा पैसे कमविण्याचया उद्देशाने बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवित होता. त्यामुळे दूरसंचार विभाग, भारत सरकार व मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज हे मागील किती वर्षांपासून चालू होते, याबाबत तपास सुरु आहे.
ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक पुणे युनिट (Pune ATS) यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. दहशतवादी कृत्यास सहाय्य होईल, असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उध्वस्त केले आहे. तसेच भारत सरकारची भविष्यात होणारी आर्थिक फसवणुकीस प्रतिबंध केला आहे. आपल्या परिसरात असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरु असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा एटीएसशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. (Kondhwa Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा