Kondhwa Pune Crime News | पुणे: सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिलेच्या दुचाकीवर चड्डी बनियनवर बसून अश्लिल हावभाव करुन विनयभंग, कोंढव्यातील घटना

Molestation Case

पुणे: Kondhwa Pune Crime News | सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिला कामाला जाण्याच्या वेळी मुद्दाम चड्डी, बनियनवर येऊन तिच्या दुचाकी गाडीवर तो बसत असतो. चोरुन पाठलाग करणे, अश्लिल हावभाव करुन त्रास देत होता. शेवटी या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. (Molestation Case)

कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) प्रल्हाद आणि संतोष अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ पासून ३० सप्टेबर २०२४ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीत रहायला आहेत. प्रल्हाद याला फिर्यादी त्यांनी सोसायटीत राहणे आवडत नव्हते. त्यामुळे तो काहीना काही कारण काढून वाद निर्माण करत असे. संतोष याने फिर्यादी यांच्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्यांनी त्याला दाद दिली नाही. तेव्हा तो वेगवेगळ्या मार्गाने त्रास देऊ लागला.
फिर्यादी जेथे गाडी पार्क करतात, बरोबर तेथे संतोष याने स्वत:चा कॅमेरा बसविलेला असून त्याचा
अ‍ॅक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये आहे. त्यावरुन तो पाळत ठेवत असतो.
तसेच वारंवार गुपचुप पाठलाग करत असतो.
हा त्रास असह्य झाल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. API
सुकेशिनी जाधव (API Sukeshini Jadhav) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed