Kondhwa Pune Crime News | कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनीच दुकानात शिरुन नासधूस केल्याचा आरोप; बिसलरी, चकना, ग्लास न विकण्याचा दिला होता इशारा (Video)

Kondhwa Pune Crime

पुणे : Kondhwa Pune Crime News | कोंढव्यातील वाडकर वाईन शॉप शेजारील स्रॅक्स दुकानात चकणा, पाण्याची बाटली, ग्लासची विक्री करु नये, असे सांगूनही त्याची विक्री करत असल्याचे दिसल्याने कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दुकानात शिरुन काऊंटरवरील वस्तू काठीने खाली पाडून त्यांची नासधुस केली असा आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवून खटला दाखल केला. तसेच दुकान पुन्हा उघडायचे नाही, असा आदेश दिला असल्याचे दुकानदार सुनिल शिवाजी मुकडे यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (PI Vinay Patankar) यांनी सांगितले की, दुकानात चकणा, पाण्याची बाटली, ग्लास विक्रीला ठेवायचे नाही, असे 3 वेळा नोटीस देऊनही ते विक्री करीत असल्याने त्यांच्या दुकानात कारवाई केल्याचे सांगितले. (Kondhwa Police Station)

https://www.instagram.com/reel/DGZ1sIwJkpI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

याबाबत पोलिसांनी व दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील वाडकर वाईन शॉप शेजारी सुनिल मुकडे यांचे स्रॅक्सचे दुकान आहे. सुनिल मुकडे यांनी सांगितले की, आम्ही दुकान सकाळी उघडून रात्री साडेदहा वाजता बंद करतो. कधीही नियमापेक्षा उशिरापर्यंत दुकान उघडे नसते. असे असताना पोलीस येऊन वारंवार कारवाईची धमकी देत असतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा – सात वाजता कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर हे दुकानात आले. त्यांनी काऊंटरवरील वस्तू खाली पाडून त्याचे नुकसान केले. दुकान बंद करायला लावून रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याचा खटला दाखल केला. शनिवारी जाऊन भेट घेतली तर दुकान उघडायचे नाही, असे सांगितले. दुकानासमोर कोणालाही बसायला जागा नाही, की कोणतीही वस्तू बाहेर ठेवत नाही. कोणतेही अवैध काम करत नाही. या दुकानावरच माझे दुकान चालते. दुकान बंद झाले तर आम्ही जगायचे कसे, असे दुकानदार सुनिल मुकडे यांनी सांगितले.

दारू दुकानाला मोकळीक पण शेजारी दुकानदारांवर बंधने

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, वाडकर वाईन शॉपच्या शेजारील दुकानात चकणा, पाण्याची बाटली, ग्लास विकतात. त्यामुळे लोक दारु दुकानातून दारु घेऊन या दुकानातून चकणा, पाणी, ग्लास घेऊन तेथेच दारू पिण्यास बसतात. यापूर्वी तेथे दोन -तीन गुन्हे झाले आहेत. या दुकानदारासह तेथे भेळ विक्री करणारे व अंडा विक्री करणारे यांनाही तीन तीनदा नोटीसा देऊन या वस्तू येथे विकायच्या नाही, असे सांगितले होते. तरीही ते या वस्तू तेथे विकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याचे विनय पाटणकर यांनी सांगितले.

वाईन शॉपमधून दारु विकत घेतल्यानंतर लोक उघड्यावर दारु पिण्यास बसतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्या वाईन शॉप दुकानाना मोकळीक देऊन शेजारील दुकानदारांवर बंधने आणण्याचा हा अजब प्रकार प्रथमच ऐकण्यात आला. कोंढवाच नाही तर शहरातील जवळपास सर्व वाईन शॉपच्या जवळपास अंडा भुर्जीच्या गाड्या व चकणा विक्रीच्या गाड्या लावलेल्या दिसून येतात. जवळच्या किराणा दुकानात थंड पाण्याच्या बाटल्या, ग्लास विकत मिळतात. पण, आजवर कोणत्या वस्तू कोणी विकायच्या आणि कोणत्या वस्तू विकायच्या नाहीत, असे बंधन कधीही कोणत्याही दुकानदारावर घातल्याचे ऐकिवात आले नाही. (Kondhwa Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed