Koregaon Park Police News | कोरेगाव पार्क पोलिसांकडून अट्टल वाहन चोरास 12 तासात अटक; 2 चारचाकी व 5 दुचाकी हस्तगत (Video)

पुणे: Koregaon Park Police News | शहरात वाहनचोरीच्या गुन्हांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Vehicle Theft Detection)
या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी अभिषेक शरद पवार Abhishek Sharad Pawar (वय ३६ वर्षे, रा गुरुवार पेठ, पंचहाऊस टॉवर जवळ, पुणे) हा खालापुर टोलनाका (Khalapur Toll Plaza) या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोरेगाव पार्क, हडपसर (Hadapsar Police Station), येरवडा (Yerawada Police Station), खडक (Khadak Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यापुर्वीही त्याच्यावर पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
त्याच्यासोबत सुजित दत्तात्रय कुंभार Sujith Dattatraya Kumbhar (वय ३६ वर्ष रा. कौहनपुर, खेड शिवापुर ता. हवेली जि.पुणे) हा देखील सराईत वाहन चोर असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली.
गुन्हयाच्या तपासात दोन्ही आरोपीकडून ७ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १० लाख ७७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये १ मारुती सुझकी कंपनीची इर्टीका गाडी, १ टेम्पो, १ हिरो होंडा पैशन प्लस, २ स्प्लेंन्डर प्लस, १ अॅक्टीव्हा, १ युनिकॉर्न, अशा २ चारचाकी व ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चारचाकी व दुचाकी या खालापुर, खडक, येरवडा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कात्रज पुणे शहर, या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची ही कामगिरी अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर) IPS Amitesh Kumar, रंजन कुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर) IPS Ranjan Kumar Sharma, प्रविण पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) IPS Pravinkumar Patil, स्मार्तना पाटील (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २) IPS Smartana Patil, दिपक निकम (सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे) ACP Deepak Nikam, रुणाल मुल्ला (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) PI Runal Mulla, चेतन मोरे पोनि. (गुन्हे) PI Chetan More, यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस ठाणे तपास पथकाचे श्रीकांत चव्हाण (पोलीस उप-निरीक्षक) PSI Shrikant Chavan , शांतिमल कोळ्हुरे (पोलीस उप निरीक्षक) तपास पथकाचे पोलीस अंमलदार, विजय सावंत, रमजान शेख, मयुर शिंदे, प्रविण पडवळ, संदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे,हनुमंत जगताप या पथकाने तपास करुन ही कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली