Koregaon Park Pune Crime News | रागाने बघण्याच्या कारणावरुन फायटरने तोंडावर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : Koregaon Park Pune Crime News | रागाने का बघतोय तुला जास्त मस्ती आली का असा आरडाओरडा करुन गाडीची चावी काढून घेऊन दोघांनी तरुणाला फायटरने तोंडावर मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सुरज सुभाष शिरोळे (वय २६, रा. ताडीवाला रोड, रेल्वे क्वॉर्टर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल रेड्डी, विपुल हिंगवले यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही प्रकार रुबी हॉल क्लिनिकचे मेन गेटसमोरील रोडवर रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र आकाश हे रुबी हॉॅल क्लिनिकच्या मेनगेटसमोरील रोडवर गाडीवर थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी तू आमच्याकडे रागाने का बघतोय़ तुला जास्त मस्ती आली का? असे मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन फिर्यादीच्या गाडीची चावी काढली. तेव्हा फिर्यादी यांनी चावी का काढली असे विचारल्यावर आरोपींनी थांब तुला आज खल्लासच करतो अशी धमकी देत फिर्यादीच्या अंगावर धावुन येऊन हातातील फायटरने डोक्यावर मारत असताना फिर्यादीने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला.
त्यात फायटरचा आघात नाकावर लागला. आरोपींनी नाका तोंडावर जोरजोराने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आकाश हा पुढे आला असताना त्याला देखील फायटरने मारहाण करुन जखमी केले.
आम्ही भाई लोक आहोत. आम्ही काहीही करु शकतो, अशी धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Koregaon Park Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”,
सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ