Koregaon Park Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधुन चोरी करणार्या परप्रांतीय केअरटेकरला भुसावळमधून अटक; कोेरेगाव पार्कमधील घटनेत
पुणे : Koregaon Park Pune Crime News | केअर टेकर म्हणून नेमलेल्या तरुणानेच ८० वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्यांनी येऊन त्यांची सुटका केली. कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) भुसावळ रेल्वे पोलिसांच्या (Bhusaval Railway Police) मदतीने २४ तासाच्या आत या केअर टेकर मुलाला पकडले. (Caretaker Arrested In Robbery Case)
याबाबत त्यांचा मुलगा रवींद्र जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ५६, रा. गंगा मेलरोजी, सोपानबाग) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत १ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल जगदीशप्रसाद अग्रवाल ८० वर्षांचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह सोपानबाग येथे राहतात. वडिलांच्या देखभालीसाठी १५ ते २० दिवसांपूर्वी एका मुलाला नेमले होते. तो येऊन घरातील काही कामे व वडिलांना काय हवे नको ते पहात असे. १ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे आला़ त्याने बेडरुममध्ये वडिलांना नॉयलॉनच्या दोरीने बांधले. रुमालाने तोंड बांधुन त्यांना चाकूचा धाक दाखविला.
‘‘तेरे पास जितना पैसा है, वह मुझे दे दे, नही तो यही चाकू से तेरे को मार दुंगा,’’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे असलेले ३२ हजार रुपये व २ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना बेडरुममध्ये बंद करुन तो पळून गेला. जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी कसेतरी करुन तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करुन आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणार्यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे तो कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेने मध्यप्रदेशाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे समजले.
त्याप्रमाणे भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत सर्व रोख रक्कम व मोबाईल मिळाला.
त्याच्याकडील आधार कार्ड, पॅनकार्ड, पी एम आयुष्यमान कार्ड इत्यादी कागदपत्रावरुन तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर, पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे,
सहायक फौजदार सावंत, क्षीरसागर, पोलीस हवालदार सोनवणे, जढर, शिंदे, जाधव,
पोलीस अंमलदार वेताळ, सोनवणे यांनी केली आहे. (Koregaon Park Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात