Koregaon Park Pune Crime News | पुणे: परप्रांतीय केअर टेकर तरुणानेच 80 वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोकड पळविली; ज्येष्ठाने आरडाओरडा केल्याने शेजारच्यांनी केली सुटका
पुणे : Koregaon Park Pune Crime News | केअर टेकर म्हणून नेमलेल्या तरुणानेच ८० वर्षाच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Robbery Case). सुदैवाने त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्यांनी येऊन त्यांची सुटका केली.
याबाबत त्यांचा मुलगा रवींद्र प्रसाद अग्रवाल (वय ५६, रा. गंगा मेलरोजी, सोपानबाग) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चिंटु चर्तुवेदी (वय १९, रा. कुम्हारी, ता. अमरपटन, जि. सतना, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत १ जानेवारी रोजी सकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल प्रसाद अग्रवाल ८० वर्षांचे असून अग्रसेन सोसायटीत ते एकटेच राहतात. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह सोपानबाग येथे राहतात. वडिलांच्या देखभालीसाठी १५ ते २० दिवसांपूर्वी चिंटु चर्तुवेदी याला नेमले होते. तो सकाळीच येऊन घरातील काही कामे व वडिलांना काय हवे नको ते पहात असे. १ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान आला. त्याने बेडरुममध्ये वडिलांचे नॉयलॉनच्या दोरीने बांधले. रुमालाने तोंड बांधुन त्यांना चाकूचा धाक दाखविला. “तेरे पास जितना पैसा है, वह मुझे दे दे, नही तो यही चाकू से तेरे को मार दुंगा,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना बेडरुममध्ये बंद करुन तो पळून गेला. फिर्यादी यांचे वडिल प्रसाद अग्रवाल यांनी कसेतरी करुन तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करुन आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणार्यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक शांतामल कोळ्ळुरे तपास करीत आहेत. (Koregaon Park Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’
Pune Police MPDA Action | धडाकेबाज ! अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक;
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना केले स्थानबद्ध