Koregaon Park Pune Crime News | पुण्यातील महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून बलात्कार ! Instagram वरुन झाला होता संपर्क, आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलांचा समावेश

Gang-Rape

पुणे : Koregaon Park Pune Crime News | लहान मुली, शालेय, महाविद्यालयीन तरुणींवर वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयातून ‘गुड टच, बॅड टच’ (Good Touch Bad Touch) कार्यक्रम घेतले जातात. अशाच एका कार्यक्रमातून तरुणीवर चौघांनी लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) याप्रकरणी पोक्सो अंतर्गत (POCSO Act) बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दोघा जणांना अटक केली तर, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Pune Rape Case)

https://www.instagram.com/reel/DAYJHl5pG3r/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

ओम आदेश घोलप Om Adesh Gholap (वय २०) आणि स्वप्निल विकास देवकर Swapnil Vikas Devkar (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

https://www.instagram.com/p/DAXp0KaiYFD

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी सांगितले की, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एक तरुणीने तणावाखाली होती. ती कॉन्सिलरकडे गेली. त्यावेळी बोलताना या तरुणीने माझी एक मैत्रिण कायम तणावाखाली असून तिच्याबाबत काही गैर प्रकार झाल्याचा संशय आहे, असे सांगितले. त्यानंतर या कॉन्सिलरने महाविद्यालयांच्या ट्रस्टींना याबाबत माहिती दिली. त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांशी २४ सप्टेबर रोजी रात्री संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीला आई वडिलांसह बोलविण्यात आले. तिचा इन्स्टाग्रामवरून चौघांशी संपर्क झाला होता. त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळी शारीरीक संबंध आल्याचे तिने सांगितले. ही तरुणी अल्पवयीन असल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

https://www.instagram.com/p/DAX0OpPp66a

त्यातील एक आरोपी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. इतर अन्य महाविद्यालयातील आहेत. दोघे जण अल्पवयीन असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे अजून तरी समोर आले नाही. हा प्रकार एप्रिल ते सप्टेबर दरम्यान झाला असून कोणत्याही पार्टीमध्ये झाला नसल्याचे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAX3QlUpT7v

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed