Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Chandrakant Patil

पुणे: Kothrud Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राज्यात लगबग सुरू झाली आहे. अशातच महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर पर्वतीमधून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) तर शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DBgDIHepPsl

आज चंद्रकांत पाटील यांनी संपुर्ण जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोथरूडकरांच्या साथीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. चंद्रकांत पाटील यांना साथ देण्यासाठी कार्यकर्त्यांचा पुण्यात जनसागर उसळला होता. यावेळी ‘कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा चंद्रकांतदादा’ असा नारा यावेळी देण्यात आला.

कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघातील सर्व मंदिरांमध्ये जात दर्शन घेतलं आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरहाध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले आहेत.

“क्रांतीकारकांच्या पवित्र ठिकाणी जाऊन भेट देणं तसेच कसबा गणपतीचं दर्शन घेतलं दिवंगत खासदार गिरीष बापटांच्या घरी भेट दिली. आरएसएसच्या हेडकॉर्डरला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पुतळ्याला हार घालून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली. लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या ७४,५०० मताधिक्य मिळालं त्यापेक्षा १ मत नक्कीच जास्त मिळावं, असा सर्वांचा संकल्प आहे. या निवडणुकीत ७४,५०० पेक्षा एकही मत कमी होणार नाही. कडक ऊन असताना देखील ‘आम्ही येणार’ असं म्हणत स्वत:हून लोक उत्फुर्तपणे आले आहेत. हे पाहता विजय तर निश्चितच आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीकडून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. मात्र अद्याप कोणाला उमेदवारी देण्यात आली नाही. तर मनसेकडून किशोर शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू