Kothrud Assembly Constituency | “कोथरूड विधानसभेला सामोरे जाताना सर्वांची मोलाची साथ आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या”, भाजप नेते अमोल बालवडकर यांचे आवाहन

Amol Balwadkar

पुणे : Kothrud Assembly Constituency | आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. आर्य वैश्य कोमटी समाज (श्री नगरेश्वर देवालय), पुणे आणि अमोल बालवडकर फाउंडेशनच्या (Amol Balwadkar Foundation) वतीने ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुस रोड, पाषाण येथे आयोजित करण्यात आलेल्या कोजागिरी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भव्य दांडियाचा कार्यक्रमही अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमानंतर भोजन व त्यासोबत मसाला दूधाचा आस्वाद नागरिकांनी घेतला.

या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित नागरिकांशी अमोल बालवडकर यांनी संवाद साधला. “आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून आपल्या सर्वांची मोलाची साथ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या” , असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी अनिल बाप्पू ससार, गौरव लक्ष्मीकांत रुद्रकंठवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार,
महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरी कोले, वासवी सत्रं समुदायमचे अध्यक्ष देवकी व्यंकटेस्वरालू,
वासवी सत्रं समुदायमचे सरचिटणीस अल्लूरी लक्षमैया, आर्य वैश्य कोमटी समाज (श्री नगरेश्वर देवालय)
पुणे येथील अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले आदींसह आर्य वैश्य कोमटी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kothrud Assembly Constituency)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed