Kothrud Assembly Constituency | भाजपचे अमोल बालवडकर कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक (Video)
पुणे: Kothrud Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीत कोथरूड मतदारसंघ हा भाजपला (BJP) सुटण्याची शक्यता आहे. कोथरूड मतदारसंघात असलेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) अन् मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना दिल्लीत संधी मिळाल्याने येथे चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असताना माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी कोथरूड विधानसभेतुन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी तसा दावा देखील केला आहे.
या मतदारसंघात मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. त्यांची उमेदवारी कट करून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना हा मतदार संघ देण्यात आला होता. मात्र यंदा इथल्या स्थानिक नगरसेवकानेच या मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Kothrud Assembly Constituency)
भाजपचे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभेत शड्डू ठोकत उमेदवारी मिळविण्यासाठी दावा केला आहे. ते कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असून आहेत. सध्या कोथरूड विधानसभेचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील असून त्या मतदारसंघावर बालवडकर यांनी दावा केल्याने भाजपमध्ये कलह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमोल बालवडकर यांनी बालेवाडीत मोठे शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेवर दावा केला आहे. मी भाजपमधून इच्छुक असून पक्ष माझा नक्की विचार करेल. तसेच भाजप पक्ष हा मेरीटच्या आधारावर उमेदवार निवडेल असे विधान अमोल बालवडकर यांनी केले आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य