Kothrud Assembly Constituency | चंद्रकांत पाटील पाषाण, बाणेर बालेवाडीतील ग्रामदैवतांच्या दर्शनाला ! ग्रामस्थांकडून नामदार पाटील यांचे जोरदार स्वागत

Chandrakant Patil-Murlidhar Mohol

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती

पुणे : Kothrud Assembly Constituency | नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी बाणेर-बालेवाडी (Baner Balewadi) मधील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही चंद्रकांत पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस सचिन दळवी,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर,राहुल कोकाटे,मोरेश्वर बालवडकर,अनिकेत मुरकुटे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर,प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा,रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, पुनम विधाते, भगवानतात्या निम्हण,ज्ञानेश्वर पारखे,पोपटराव जाधव, तानाजी काकडे, , काशिनाथ दळवी,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाण मधील मारुती भैरवनाथ, बाणेर मधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी नागरिकांकडूनही नामदार पाटील यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

यावेळी नामदार पाटील कृतज्ञता व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुड करांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बाणेर बालेवाडीकरांनी मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चंद्रकांत पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा भैरवनाथाच्या साक्षीने शब्द देतो, अशी भावना व्यक्त केली.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’