Kothrud Assembly Constituency | कोथरुड विधानसभा : वर्षाचे 365 दिवस जनतेच्या सुख-दुःखामध्ये सहभागी असणारा आपला माणूस म्हणजे अमोल बालवडकर

पुणे : Kothrud Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाकडे आणि जनतेकडे जाऊन आपली भूमिका मांडताना दिसत आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून अमोल बालवडकर यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्याविषयी अमोल बालवकडकर (Amol Balwadkar) काय म्हणतात, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांच्याच शब्दात वाचा. (Maharashtra Assembly Election 2024)
अमोल बालवडकर म्हणतात की, श्रावण मंगल मास सुरु आहे. त्यानिमित्ताने आपल्या अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या (Amol Balwadkar Foundation) वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक उपक्रम सुरु आहेत. मंगळागौरी (Mangalagaur) कार्यक्रम असेल, रक्षाबंधन (Raksha Bandhan) असेल किंवा नाट्य महोत्सव असेल, यातील प्रत्येक उपक्रमाला हजारो माता भगिनी सहभागी झाल्या. तीन दिवस सुरु असलेल्या या नाट्य महोत्सवाला कोथरुड (Kothrudkar) रसिकांनी अभुतपूर्व गर्दी केली होती. राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) नावनोंदणी घरोघरी जाऊन केली. मला सांगण्यास आंनद वाटतो, की कोथरुड मतदारसंघात आपण १० हजारहून अधिक माताभगिनीचे अर्ज भरुन घेतले. दारोदारी जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन अर्ज भरुन घेतले. त्यांना राज्य शासनाची दीड हजार रुपयांची ओवाळणीही सुरु झाली आहे, असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दही हंडीचा (Dahi Handi) सोहळाही २७ ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याचे निमंत्रण मी आताच सर्वांना देतो, अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व कार्यक्रम आपण सर्व जण ज्या उत्साहाने यशस्वी करता आहात, त्यामुळे हुरुप वाढला आहे. माझ्यावर जी प्रेमाची बरसात करता आहात, मी मनापासून सर्वांचा ऋणी आहे. आपले आशिर्वाद असेच पाठीशी असू द्यावेत. अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला हजारोंची गर्दी पाहून पुण्यात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. खरं तर त्यामुळेच आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसमोर आलो आहे.
मला या गोष्टींचा आनंद आहे़ की जे सांस्कृतिक उपक्रम, जनहिताचे कार्यक्रम गेली १० वर्ष मी बाणेर (Baner), बालेवाडी (Balewadi), पाषाण (Pashan), कोथरुड (Kothrud), सुतारवाडी (Sutarwadi), महाळुंगे (Mahalunge), सुस (Sus) या परिसरात राबवत आलो आहे. त्याची जास्तच दखल प्रसार माध्यमांनी घेतली आहे. त्या सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो. पण, एक नम्रपणे सांगतो की, हे निवडणुकीचे वर्ष असो की नसो. अमोल बालवडकर हा सतत लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. पाच वर्षांनी एकदा येणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची माझी कधीच प्रवृत्ती नाही. अमोल बालवडकर फाऊंडेशनची जी कामे वर्षभर सुरु असतात, जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी अमोल बालवडकर कायमच उपस्थित असतो.
वाहतूक कोंडीतून (Pune Traffic Jam) नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमोल बालवडकरच रस्त्यावर उतरतो. अमोल बालवडकरचे वॉर्डन त्या ठिकाणी चौका चौकात उभे असतात. अमोल बालवडकरच ट्रॉफिकचा मुुद्दा सोडविण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाविरुद्ध आंदोलन करतो. नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी घरामध्ये मिळावे, यासाठी अमोल बालवडकरच चांदणी चौकातील टाकीवर १५ -१५ दिवस मध्यरात्री दोन दोन – तीन तीन वाजेपर्यंत उभा असतो. अतिवृष्टीचे पाणी सोसायटीत घुसू नये किंवा घुसलेले पाणी काढण्यासाठी अमोल बालवडकर व त्याची टीम, २५ माणसे घेऊन जेसीबी, पाण्याचे टँकर, जनरेटर, पाण्याचे पंप घेऊन जाणारा अमोल बालवडकरच असतो. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, की शहरात डेंग्यु, चिकनगुनिया साथ सर्वत्र पसरली आहे. प्रत्येक घरात एकतरी डेंग्यु पेशंट दिसतो. तुम्हाला महापालिका कोठे दिसणार नाही पण, अमोल बालवडकर व त्याची टीम क्लोड लिक्विड फॉगची फवारणी करताना तुम्हाला दिसेल. आतापर्यंत शेकडो, सोसायटी,वस्ती भागात क्लोड लिक्विड फॉगची फवारणी झाली आहे. मुद्दा इतकाच आहे की माझा जनसंपर्क.
सांस्कृतिक उपक्रम, जनहिताचे कार्यक्रम याचा येत्या निवडणुकीशी जोडण्याचे खरंच काही कारण नाही. अमोल बालवडकर वर्षाचे ३६५ दिवस जनतेच्या सुख दु:खामध्ये सहभागी असत. मला कल्पना २०२४ शी विधानसभेची निवडणुक तोंडावर आली आहे. मी भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. महापालिकेत नगरसेवक, शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष म्हणून मी अतिशय चांगले काम केले आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या फौंडेशनच्या कार्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जाऊ शकतो, हे मी समजू शकतो. अमोल बालवडकर कोथरुड विधानसभा लढविणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. अमोल बालवडकर बंडखोरी करणार? अशी कुजबुज मोहिम राबविली जाते आहे. हजारो कोथरुडकर मला आतापासूनच आग्रहाने सांगताहेत की अमोलभय्या, यंदा आम्ही ठरविलयं, तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला उभे रहा, आमचे मत तुम्हालाच आहे.
आमच्या सोसायटीचे मत तुम्हालाच आहे. पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे.
राष्ट्र प्रथम, भगवा ध्वज हाच गुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मानणारा एक कार्यकर्ता आहे.
माझ्या पक्षाची परंपरा अशी आहे की जेथे पार्श्वभूमी, जात, धर्म आर्थिक स्थिती, घराणेशाही याला महत्व दिले जात नाही.
म्हणून लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एक मुलगा पुढे जाऊन देशाचा पंतप्रधान होतो.
अत्यंत गरीब कुटुंबातील आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकली.
आदरणीय देवेंद्र फडणवीसपासून (Devendra Fadnavis) विनोदजी तावडेपर्यंत (Vinod Tawade)
आदरणीय नितीन गडकरीपासून (Nitin Gadkari) रावसाहेब दानवे पाटील (Raosaheb Danve Patil)
यांच्यापर्यंत शेकडो नेत्यांना अगदी तरुणपणी संधी देणारा माझा पक्ष आहे. तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवणारा माझा पक्ष आहे.
इथं किंमत कामाला आहे. इथं महत्व तुमच्या राष्टीय विचारधारेला आहे.
राजकीय क्षेत्रात काम करताना महत्वाकांक्षा बाळगणे गैर काहीच नसते.
मला खात्री आहेकी, उद्या विधानसभेची धामधुम सुरु होईल,
तेव्हा मी माझी भूमिका वरिष्ठांपुढे मांडण्याची संधी माझा पक्ष निश्चित मला देईल.
त्यावेळी जो निर्णय होईल, तो मी आपल्या सर्वांपर्यंत पोहचवेल. तोपर्यंत आणि त्या नंतरही अमोल बालवडकर
कोथरुडकरांच्या सेवेत कायम असेल, ऐवढेच आता सांगतो, असे अमोल बालवडकर यांनी सांगितले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद