Kothrud Assembly Constituency | चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवाराचे आव्हान; जागावाटपावरून महायुतीत तिढा

पुणे: Kothrud Assembly Constituency | महायुतीत (Mahayuti) तीन पक्ष एकत्र आल्याने जागावाटपावरून रस्सीखेच दिसून येत आहे. एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच आता कोथरूड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
कोथरूडमध्ये सध्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजपचे विद्यमान आमदार (BJP MLA) आहेत. आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Ajit Pawar NCP) माजी शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष विजय डाकले (Vijay Dakle) यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
विजय डाकले यांनी कोथरुड मधून निवडणूक लढवणार असल्याचे म्हंटले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ” मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. परंतु नंतर माघार घेण्यास सांगितले. तसेच सध्या कोथरूडमध्ये रस्ते, कचरा वाहतूक सह अनेक प्रश्न तसेच आहेत.
कोथरुडमध्ये सतत वेळ देणारा आमदार हवा अशी कोथरुडकरांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवल्या आहेत”, असेही डाकले यांनी सांगितले.
कोथरुड मतदारसंघात राष्ट्रवादी तसेच इतर पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडणूक लढण्यासाठी आग्रह करीत असल्याचे डाकले यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच विजय डाकले यांनी फेसबुक लाईव्ह करीत आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच त्यांनी कोथरुड मतदारसंघात गाठीभेटी आणि विविध कार्यक्रम राबवण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. आता भाजप आणि चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात? अजित पवार वेगळा निर्णय घेणार का? याची चर्चा कोथरुडमध्ये सुरु आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)