Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Chandrakant Patil

फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीने जागोजागी उत्साहात स्वागत

पुणे: Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निवडणूक प्रचार्थ बाणेर-बालेवाडी भागात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाणेरकरांकडून या रॉलीचे जंगी स्वागत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या घरोघरी भेटी घेऊन संपर्क अभियान राबविले आहे. त्यासोबतच आज भाजपा कोथरूड उत्तर मंडलच्या वतीने महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बाणेर- बालेवाडी भागात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोझे कॉलेज, साई चौक, ममता चौक, दसरा चौक – बालेवाडी गावठाण, बालेवाडी- ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, बालेवाडी- भीमनगर, पाण्याची टाकी, लक्ष्मीमाता मंदिर, चाकणकर मळा, बालेवाडी फाटा, माधव बाग, छत्रपत्री शिवाजी महाराज स्मारक, बाणेर गावठाण, दत्तमंदिर, बाणेर गावठाण, राघुनाना चौक मुरकुटे गार्डन, युतिका सोसायटी – चांदेरे चौपाटी, अंजोर सोसायटी आदी मार्गे ही रॅली मार्गस्थ झाली. तर माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचे जनसंपर्क कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर अनेक चौकांमध्ये महिलांकडून औक्षण करुन आ. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार पाटील यांनी बैलगाडीचेही सारथ्य करत, साऱ्यांचेच लक्ष्य वेधले.

यावेळी भाजप उत्तर उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न सुटला..!

Hadapsar Assembly Election 2024 | महायुतीतील ‘पुरंदर’च्या लढ्याचे लोन ‘हडपसर’मध्ये पसरण्याची शक्यता !

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद ! किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

Raj Thackeray | पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका; राज ठाकरेंनी घेतली दखल; कारवाईचे संकेत

You may have missed