Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यास भाजपला यश; चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन; पेढा भरवत नाराजी दूर (Video)

पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून (BJP) निवडणूक लढण्यासाठी भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) इच्छुक होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील घरोघरी ते पोहोचले होते. मात्र भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना या मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. त्यानंतर अमोल बालवडकर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/DBqL506p90Z
कोथरूड विधानसभा मतदारसंघात ते बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी वाढली होती. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही बालवडकर यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र आज अखेर चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवत बालवडकर यांची समजूत काढली आहे. दरम्यान आता बालवडकर यांनी विधानसभेतून माघार घेतली असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. (Kothrud Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा