Kothrud Assembly Election 2024 | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती; अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे व पदयात्रेचे आयोजन

Chandrakant Patil-Amol Balwadkar

पुणे: Kothrud Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान दिवाळी सण असल्याने विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्याचे पाहायला मिळाले होते. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा कोथरूड परिसरातील धार्मिक कार्यक्रमांत सहभाग, दिवाळी फराळ कार्यक्रमात उपस्थिती, नामवंतांच्या व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे, या कार्यक्रमातून संपर्क सुरू ठेवला आहे.

जागतिक स्तरावरील नामांकित मोजक्या भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये ज्याच्या नावाची गणना होते असे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे निवासस्थान कोथरूडमध्ये आहे. ‘ग्रँडमास्टर’ हा किताब मिळविणारे ते पहिले पुणेकर आहेत. अशा हरहुन्नरी बुद्धिबळपटूला भेटण्याचा योग पाटील यांना आला.

औंध येथील माँ सरला कलिंगा समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित नामसंकीर्तन सोहळ्यात सहभागी होऊन पाटील यांनी प्रभुजींचे आशीर्वाद घेतले आणि या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोर्चा पुणे शहर कार्याध्यक्षा पूनम विधाते यांची पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष विशाल विधाते, सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि विठ्ठल बराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास उपस्थित राहून पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांच्या भेटी झाल्या.

भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या नेतृत्वाखाली बाणेरला बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भाजपच्या कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नियोजन बैठकीस उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या नियोजनाबाबत बालवडकर यांनी सर्वांशी चर्चा केली. भव्य रॅलीचे व पदयात्रेचे तसेच आगामी काळातील प्रचारासाठीचे नियोजन यावेळी करण्यात आले. पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांचा ‘तो’ निर्णय ‘गेमचेंजर’ ! त्यामुळेच कोथरूडकर देखील चंद्रकांत पाटील यांच्यापाठीमागे खंबीर राहणार ?

Chandni Chowk Pune | पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी



You may have missed