Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी ! कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील (Anjali Chandrakant Patil) यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा भक्कम आधार असतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा यांना त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने कॉस्ट ऑडिटर असलेल्या अंजली पाटील यांची वेळोवेळी साथ मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. नागरिकांमधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होऊन; कोथरूड मधील अनेकांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.
यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भुपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या. (Kothrud Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”