Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडमध्ये आजी- माजी आमदारांमध्ये लढत ! मनसे उमेदवार कशापद्धतीने आपला रंग भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा; चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील गाठीभेटी वाढल्या
पुणे: Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेच्या उमेदवारांची (MNS Candidate) घोषणा झाल्याने येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत होणार असून त्यात मनसे उमेदवार कशापद्धतीने आपला रंग भरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १५ दिवस उरलेआहेत. त्यामुळे मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान दिपावलीची किनार पकडत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मतदारसंघातील भेटीगाठींचा जोर वाढवला आहे.
आज (दि.3) कोथरूड मतदारसंघातील मिलाप सोसायटीतील रहिवाशांची भेट घेऊन कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान या मतदारसंघात आजी माजी आमदारात ही विधानसभेची लढत होणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा