Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाची सेवा हाच ध्यास – चंद्रकांतदादा पाटील
गोसावी वस्ती, नवीन शिवणे मध्ये पदयात्रा आणि चौक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरुड मधील प्रत्येक नागरिक सुखी आनंदी राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून; कोथरुडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असल्याचा संकल्प भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केला. महायुतीच्या प्रचारार्थ आज कोथरूड मधील गोसावी वस्ती, नवीन शिवणे भागात चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड प्राची बगाटे, सरचिटणीस गिरीश खत्री, दिपक पवार यांच्या सह भागातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत जी काही कामे किंवा उपक्रम कोथरुड विधानसभा मतदारसंघात राबविले; ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविले नाहीत. उलट सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केले. त्यामुळे कोथरूडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असून; पुढेही कोथरुड मतदारसंघातील सेवा उपक्रम सुरुच राहणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना ही उच्च शिक्षणाची संधी मिळावी, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. कोविडनंतर मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी लोकसहभागातून अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींची शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. त्यासाठी ९०० कोटींची तरतूद केली. याशिवाय कोविडनंतर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊन हातभार लावला, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे समाजासाठी समर्पित व्यक्तीमत्व आहे.
सेवा आणि समर्पण हाच त्यांचा जीवनाचा मंत्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक दु:खी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
समाजासाठी समर्पित होऊन करणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मंडलाचे सरचिटणीस दिपक पवार
यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती देऊन चंद्रकांतदादा पाटील
यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. (Kothrud Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’