Kothrud Assembly Election 2024 | कर्वेनगरमध्ये घुमला महायुतीच्या एकीचा नारा! भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादांना कर्वेनगर मधून ही वाढते जनसमर्थन
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते हातात ‘सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन चंद्रकांतदादांचे स्वागत करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. सर्वच मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी कायम राखली आहे. आज कोथरुड मधील कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टीने चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कर्वेनगर मधील नटराज सोसायटी येथील विठ्ठल मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, भागातील कार्यकर्ते ‘चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागतार्थ सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ ‘माणसातील देव माणूस’ ‘मुलींना दिली शिष्यवृत्ती दादा म्हणजे कामाला गती’ अशा आशयाचे फ्लेक्स धरुन उभे होते. तसेच ‘एक है तो सेफ है, भारतमाता की जय!’च्या घोषणांनी प्रत्येक चौक दणाणून गेला होता.
यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेवक राजाभाऊ बराटे,
नगरसेविका वृषाली चौधरी, गिरीश खत्री, विशाल रामदासी, महेश पवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवरामपंत मेंगडे,
अश्विनी ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या संगीता बराटे, रेश्मा बराटे, तेजल दुधाने, संतोष बराटे
यांच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. (Kothrud Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’