Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली, घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून घरातून निघालेली दोन अल्पवयीन मुले कोथरूड येथील पौड रोड परिसरातील किष्किंधानगरमधून बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विनायक कसबे (वय -१०) व गौतम मोरे (वय-१०) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, विनायक आणि गौतम दोघेही शाळेत जातो, असे सांगून घरून निघाले. परंतु, ते शाळेतही गेले नाहीत आणि दुसरीकडेच कोठेतरी निघून गेले. सायंकाळी ते दोघेही घरी आले नाहीत म्हणून पालकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. दोघे कोठे आढळून आल्यास त्याबाबत कोथरूड पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक संदीप पवार यांनी केले आहे. (Kothrud Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या
Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त
Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”