Kothrud Pune Crime News | पुणे : दुचाकीचा धक्का लागल्याने IT कंपनीतील तरुणाला बेदम मारहाण; गजा मारणे टोळीतील तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Marhan-Arrest

पुणे : Kothrud Pune Crime News | पान खाल्यानंतर थुंकताना ते शेजारच्याच्या अंगावर उडाल्या नंतर बाचाबाची झाली. त्यानंतर गजा मारणेच्या टोळीतील (Gaja Marne Gang) तिघांनी बुधवारी दुपारी कोथरुडमधील भर चौकात IT कंपनीतील तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे गजा मारणे टोळीतील तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी सांगितले की, भेलकेनगर चौकात फिर्यादी यांनी पान खाऊन थुंकताना ते एकाच्या अंगावर उडाल्याने त्यावेळी त्यांचा तेथे वाद झाला होता. त्यानंतर चौघांनी त्यांना अडवून मारहाण केली. गजा मारणे टोळीतील अमोल विनायक तापकीर (Amol Vinayak Tapkir), ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू (Om Teerthram Dharma Jigyasu), किरण कोंडीबा पडवळ (Kiran Kondiba Padwal) अशा तिघांना कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) ताब्यात घेतले आहे.

याबाबत देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. चिंतामणी सोसायटी, मयुर कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील भेलकेनगर चौकात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र जोग हे आयटी कंपनीत नोकरीला आहेत. सुट्टी असल्याने बुधवारी घरीच होते. सायंकाळी चार वाजता ते आपल्या दुचाकीवरुन बाहेर पडले. काम झाल्यावर साधारण साडेचार वाजता त्यांनी भेलकेनगर चौकात पान खाल्ले. तेथून गुजराथ कॉलनीकडे जात होते. रस्त्यावर लोकांची गर्दी असल्याने ते थांबले होते. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक जण त्यांना म्हणाला की, काय रे गाडी हळु चालविता येत नाही. धक्का मारतो का? त्यावर ते म्हणाले, दादा मी तुम्हाला धक्का दिला नाही, असे बोलत असतानाच त्यांच्यातील दुसरा पिवळा शर्ट परिधान केलेल्याने त्यांच्या कानाखाली व तोडांवर बुक्का मारला. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे दुचाकीवरुन खाली पडल्याने त्यांना खरचटले. त्यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ते मारहाण करीत असतानाच एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केल्याने त्यांना मुका मार लागला. त्यानंतर मारहाण करणारे गुजराथ कॉलनीच्या दिशेने दुचाकीवरुन पळून गेले. या गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, गुन्हे निरीक्षक विक्रमसिंह कदम, सहायक पोलीस निरीक्षक अडागळे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने (Sr PI Sandeep Deshmane) यांनी सांगितले की, या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित गुन्हेगारांना त्यांची ओळख पटवून ताब्यात घेण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed