Kothrud Pune Crime News | पुणे: मैत्री तोडल्याने सोशल मीडियावर मैत्रिणीचे अश्लिल फोटो केले अपलोड; मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Kothrud Pune Crime News | मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने मैत्रिणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट (Fake Account On Social Media) उघडले. त्यानंतर मैत्रिणीचे अश्लिल फोटो अपलोड करुन अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी २१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी २४ वर्षाच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोंबर ते १७ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षाच्या तरुणीचे आरोपीसोबत मैत्री होती. त्याच्या वागणुकीमुळे तिने त्याच्याबरोबरील मैत्री तोडली. त्याचा राग मनात धरुन त्याने सोशल मीडियावर तिच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले. त्यावर तिचे अश्लिल फोटो अपलोड करुन तिला कॉलगर्ल संबोधले. फिर्यादी हिने त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअप मेसेज करत देखील अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी यांचे इन्टा ग्राम, फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करुन तिला कॉलगर्ल असे म्हणून त्यावर तिचा फोन नंबर लिहून बदनामी केली. गुन्हे निरीक्षक विक्रमसिंग कदम तपास करीत आहेत. (Kothrud Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध