Kothrud Pune Crime News | पुणे : कोथरुडमधील फ्लॅटमध्ये चालत होता जुगाराचा अड्डा ! घरमालक, जुगार अड्डा प्रमुखासह 11 जणांना अटक, कोथरुड पोलिसांची कारवाई

पुणे : Kothrud Pune Crime News | फ्लॅटमध्ये जुगारासाठी जागा उपलब्ध करुन देऊन टेबल मांडून जुगार खेळणार्या जागा मालक व जुगार अड्डा प्रमुखासह ११ जणांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा ६० हजार ९८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Police Raid On Gambling Den)
घरमालक निलेश दत्तात्रय आडकर (वय ५०, रा. राजहंस कॉलनी, शास्त्रीनगर, रोड, कोथरुड), जुगार अड्डा प्रमुख गणेश् नथु दहीभाते (वय ५०, रा. कुंबरे टाऊनशिप, स्वागत रेसिडेन्सी, गुरुगणेशनगर, कोथरुड) तसेच इतर सुरेंद्र रंगनाथ काटकर (वय ५३, रा. बहिरटवाडी, सेनापती बापट रोड), संतोष विठ्ठल जोरी (वय ४७, रा. किष्कींदानगर, कोथरुड), किरण दत्तात्रय आगनेन (वय ४८, रा. दिंगबरनाथ आळी, पौड रोड), प्रवीण प्रतापराव जहागीरदार (वय ६८, रा. अनगर पार्क, सेनापती बापट रोड), सचिन बाळकृष्ण चौगुले (वय ४३, रा. रेणुका निवास, ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड), सदानंद ईश्वर सोनवणे ( वय ६४, रा. म्हाडा कॉलनी, येरवडा), लक्ष्मीकांत पांडुरंग कासार (वय ४६, रा. प्रगती निवास, कर्वेनगर), प्रमोद गुलाबराव जाधव (वय ४४, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड रोड, वाकड), योगेश रत्नेश मिश्रा (वय ४२, रा. शिंदे वस्ती, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नाव आहेत. वकिल, आर्किटेक, रिअल इस्टेट व्यावसायिक, सेवानिवृत्त असे हे सर्व जण एकत्र येऊन जुगार खेळत होते. (Kothrud Police)
याबाबत पोलीस अंमलदार जयकुमार खरात यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील गुरुगणेशनगरमधील राजहंस कॉलनीत शनिवारी रात्री अकरा वाजता सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान ईदनिमित्ताने कोथरुडमधील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी निलेश आडकर याच्या घरात पैशांवर जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी निलेश आडकर याच्या घरावर छापा मारला. तेथे फ्लॅटमध्ये टेबल लावून काही जण जुगार खेळत होते. त्यांच्यामध्ये नोटांचा ढीग पडला होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील जुगारातील ६० हजार ९८० रुपये व पत्त्यांचे कॅट जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.