Kothrud Pune Crime News | पुणे : पत्नी माहेरी गेल्याने जावयाने सासरच्या घराला लावली आग; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना
पुणे : Kothrud Pune Crime News | दोघा पतीपत्नीत भांडणे झाल्याने सासुने सुनेला माहेरी पाठविले. पत्नी माहेरी आल्याचा राग आल्याने जावयाने पाच मिनिटामध्ये घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने खरोखरच आपल्या सासरच्या घराला आग लावून दिली. त्यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
याप्रकरणी कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहील हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुतारदरा येथील काळुबाई कॉलनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कविता फेंगसे यांना तीन मुली असून त्यातील दोघींचा विवाह झाला आहे. तेजल हिचा साहील हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासु कविता हाळंदे यांचा फिर्यादी यांना फोन आला. साहील हा कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो आहे. त्यामुळे तेजल व साहील यांचे भांडण झाले आहे. तरी तेजल हिला दोन तीन दिवसांसाठी माहेरी पाठविते, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तेजल सात महिन्यांच्या बाळाला घेऊन २६ नोव्हेंबर रोजी माहेरी आली. २८ नोव्हेंबर रोजी तेजल हिला साहीलचा फोन आला. तू माहेरी का गेलीस म्हणून तिच्याशी फोनवर शिवीगाळ करुन भांडण केले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला माझ्या मुलीसोबत नीट संसार करा, नाहीतर मुलगी सासरी पाठविणार नाही, असे त्या बोलल्या़ साहील ऐकत नसल्याने त्यांनी दुसर्या मुलीला हे सांगितले. तिने साहीलला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. तरी तो ऐकत नव्हता. त्यानंतर त्यांनी २९ नोव्हेबरला भरोसा सेल येथे साहील हाळंदे याच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला.
मुलगा आजारी असल्याने ४ डिसेबर रोजी रात्री उशिरा ते मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता साहील याचा तेजल हिला फोन आला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. तरी तो सतत कॉल करत होता. रात्री सव्वा दहा वाजता साहील याचा फोन आला व तो धमकावू लागला. “आताचे आता तू इथे ये, मी तुझ्या आईच्या घरापाशी आलो आहे. तू पाच मिनिटांमध्ये जर घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन तसेच तुला पण बघुन घेइन” अशी धमकी दिली.
त्यामुळे त्या घाबरुन मैत्रिणीच्या घरी गेल्या. त्यानंतर मध्यरात्री पाऊण वाजता त्यांना फोन आला.
तुमच्या घरातून धुर येत आहे. त्या घरी आल्या. तेव्हा शेजारील लोक, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी,
कर्मचारी त्यांच्या घराला लागलेली आग विझवत होते. काही वेळात संपूर्ण आग विझली.
या आगीमध्ये त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तु, कपाटे, कपडे, गाद्या, भांडी, टिव्ही व
इतर सर्व घरातील वस्तु अर्धवट जळून खुप मोठे नुकसान झाले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत. (Kothrud Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या