Kumar Ketkar On PM Narendra Modi | नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती होतील, ज्येष्ठ पत्रकार केतकरांचा मोठा दावा, म्हणाले त्यांना हिंदू राष्ट्रात…

Kumar Ketkar PM Narendra Modi

पुणे : Kumar Ketkar On PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांच्या (Amol Kolhe) निवडक भाषणांचे संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना आता कशी वागणूक मिळत आहे ते आपण पहात आहोत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि २०२७ साली राष्ट्रपती होतील. मोदी २०३२ पर्यंत त्या पदावर राहतील. त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये जास्त इंटरेस्ट नाही पण त्यांना त्या प्रकारची इमेज हवी आहे.

कुमार केतकर म्हणाले, मोदी याचा बनारसमधला पराभव होता होता वाचला. पण मला नंतर कळले की त्यांना निवडून आणण्यात आले, त्यांचा पराभव परवडणारा नव्हता. भाजपला लोकसभेमध्ये फक्त १८० जागा मिळणे शक्य होते, मात्र त्यांना हे कळल्यानंतर त्यांनी जागा मॅनेज केल्या, पक्ष फोडले. त्यांनी गेम प्लॅन केला होता.

केतकर पुढे म्हणाले, भाजपने निवडणूक आयोगाकडून लगेच मतदान झालेली माहिती मागवली. कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झाले आणि निकाल कसा असेल हे सगळे मागवले होते. भाजपने काही संस्था ताब्यात घेण्याचे काम केले.

मोदी सरकारवर गंभीर आरोप करताना केतकर म्हणाले, पुलवामामध्ये काय झाले याबद्दल सरकारने काहीच जाहीर केले नाही. तिकडे एवढे आरडीएक्स कुठून आले? बालाकोट हल्ल्यानंतर अनभुव कळला नाही. मोदी-शाह यांनीपण सागितले नाही. कशाचीच श्वेतपत्रिका काढली नाही. निवडणूक निकालाअगोदर केदारनाथला ते तपस्या करत होते, गेल्या वेळी अशी तपस्या केली आणि जागा वाढल्या. पण यावेळी तसे काही घडले नाही, असे म्हणत केतकर यांनी मोदींवर टीका केली. (Kumar Ketkar On PM Narendra Modi)

कुमार केतकर म्हणाले, निवडणूक आयोग प्रमुखांनी राजीनामा दिला. अशी लोकशाही कधी देशात नव्हती. याआधी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि प्रत्येक खासदार प्रश्नांची उत्तरे देत होता. पण आता असे होताना दिसत नाही.
आपल्याकडे पेटड्ढोल दर वाढले तरी चालतील पण पंतप्रधान मोदी हवेत असे म्हणणारे लोक आहेत.
माझीही राज्यसभा खासदार निवड अनपेक्षित होती, माझी निवड राज्यसभेवर झाली.
माझी इच्छा नव्हती पण मला माहिती नव्हते ते झाले.

पंतप्रधानांवर टीका करताना केतकर म्हणाले, नरेंद्र मोदी कायम माझ्या शत्रूस्थानी राहिलेले आहेत.
मी गुजरातमध्ये पत्रकारिता केली आहे. मला त्यांचे कोणी मित्र, शिक्षक किंवा इतर कोणीही भेटले नाही.
चहा विकणारे स्टेशन पण नव्हते. मोदींनी त्यांच्या अनेक कथा या विज्ञानाच्या पुढे नेल्या.
राज्यसभेत मोदी खूप कमी यायचे. ते आले की भाजप सदस्य त्यांचे बाके वाजवत स्वागत करायचे.
जय श्रीराम घोषणेने त्यांचे स्वागत व्हायचे. पण अशा घोषणा दिलेले चालत नाही.

केतकर म्हणाले, मोदींना कधीही खोकला, शिंक असे काहीही आलेले आपण पाहिले नाही.
ते बायोरोबो आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या भाषणानंतर त्यांना तहान लागली.
तब्बल १२ वेळा ते पाणी प्यायले. आता त्यांना लक्षात आले असेल की आपण बायोरोबो नाही.

मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करत होते. पण निकाल आल्यावर सगळे बदलले.
जागा कमी आल्याने मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता, त्यांना हव्या तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत.
मोदींनी भाजपमधील अनेक वरिष्ठांना मार्गदर्शक यादीतच टाकून दिले आहे.
मोदींच्या काळात चर्चा न होता अनेक कायदे संसदेत पास झाले,
मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादीही म्हटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट