Kyc For LPG Customers | केंद्रीय मंत्र्यांनी केली अशी घोषणा… ऐकून कोट्यवधी एलपीजी ग्राहकांना मिळाला दिलासा

Hardeep Singh Puri

नवी दिल्ली : Kyc For LPG Customers | एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी एलपीजी कनेक्‍शन धारकांना (LPG Customer) मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्री पुरी यांनी स्पष्ट केले की एलपीजी सिलेंडरसाठी ईकेवायसी करण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही. केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन (VD Satheesa) यांच्या पत्राला एक्सवर उत्तर देताना पुरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

सतीसन यांनी एक पत्र पाठवून म्हटले होते की, केवायसी आवश्यक आहे परंतु ती संबंधीत गॅस एजन्सीवर जाऊन करण्याच्या नियमामुळे एलपीजी ग्राहकांना त्रास होत आहे. यावर हरदीप सिंह पुरी यांनी उत्तर देताना म्हटले की, बनावट खाती बंद करणे आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरची बनावट बुकिंग रोखण्यासाठी ऑईल मार्केटिंग कंपन्या एलपीजी ग्राहकांसाठी ईकेवायसी लागू करत आहेत. मात्र, पुरी यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की ईकेवायसीची प्रोसेस मागील आठ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे.

ते म्हणाले की, याचा हेतू केवळ हा आहे की, केवळ अस्सल ग्राहकांनाच एलपीजी मिळावा. प्रोसेसबाबत पुरी म्हणाले, एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी गॅस एजन्सीचा कर्मचारी ग्राहकाच्या कागदपत्रांची पडताळणी करतो. तो आपल्या मोबाईलद्वारे एका अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाचे आधार क्रेडेंशियल्स कॅप्‍चर करतो. यावेळी ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी येतो, तो नोंदवल्यावर प्रक्रिया पूर्ण होते. ग्राहक आपल्या सोयीनुसार डिस्ट्रिब्यूटरच्या शोरूमवर सुद्धा संपर्क साधू शकतो.

तसेच ग्राहक ऑईल मार्केटिंग कंपनीचे अ‍ॅप इन्स्टॉल करून आपल केवायसी प्रक्रिया स्वता पूर्ण करू शकतात.
पुरी यांनी सांगितले की, ऑईल मार्केटिंग कंपन्या अथवा केंद्र सरकारकडून ईकेवायसी पूर्ण करण्यासाठी
कोणतीही कालमर्यादा नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed