Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार; पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana

मुंबई : Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी आक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले होते.

या निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने (Mahayuti Govt) लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र दरमहा २१०० नंतर द्या मात्र डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? असा सवाल लाडक्या बहिणी विचारू लागल्या आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारी महिन्यातील रक्कम दिली जाणार आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून बहिणींच्या खात्यात जमा केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल, निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे, असे म्हणत निशाणा साधला होता.

आता निवडणूक संपली तरीदेखील ना १५०० रुपये ना २१०० रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) दोन हप्ते मिळतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed