Ladki Bahin Yojana | राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा! ‘पैसे कपात करू नका’, राज्य सरकारचे बँकांना निर्देश
मुंबई : Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यापासून राज्यातील १ कोटी ४० लाख महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी राज्यातील १ कोटी पाच लाख लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारने दोन दिवसांपूर्वीच प्रत्येकी ३ हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे.
रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम जमा झाल्याने महिला वर्गांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता. त्या रकमा काढण्यासाठी बँकामध्ये मोठी गर्दीही झाली. परंतू, प्रत्यक्षात बँकांमधून रक्कमा काढताना प्रत्यक्षात ३ हजार रुपयांची रक्कम हातात येत नसल्याचे महिलांच्या निदर्शनास आले आहे.
कमीत-कमी इतकी रक्कम खात्यात शिल्लक असावी, या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कापण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी दंडात्मक स्वरुपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हफ्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूल केल्याचे आढळले
याबाबतच्या तक्रारी पुढे आल्यानंतर राज्य सरकारने आता बँकांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, अशा सूचना महिला व बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. (Ladki Bahin Yojana)
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही.
कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे,
असेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे