Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळालेल्या बहिणींसाठी सरकार लवकरच घेणार निर्णय; जाणून घ्या

Ladki Bahin Yojana (1)

मुंबई : Ladki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून महायुती सरकारकडून (Mahayuti Govt) योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केला आहे.

मात्र या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. परंतु अजूनही अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत दिली होती. परंतु २१ ते ६५ या वयोगटातील पात्र असलेल्या मात्र अद्याप अर्ज न केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकार लवकरच अर्ज करण्याची मुदत आणखी एका महिन्याने वाढवणार असल्याचे समजते. सरकारने हा निर्णय घेतल्यास याचा लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे.

अर्ज भरला आहे मात्र अजूनही बँकेत पैसे जमा झाले नाहीत तर हे करा.

  • बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करावे.
  • आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे. त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे
    मिळतील.
  • बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा व आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता
    येईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अपलोड केले
मात्र हे बँक खाते आधारही लिंक नव्हते तर अन्य बँक खाते आधारही लिंक होते.
त्यामुळे अनेक महिलांचे पैसे त्या खात्यावर वर्ग झाले आहेत.
त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे तपासून घ्यावे. (Ladki Bahin Yojana)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed