Ladki Bahin Yojana | निकषांची पडताळणी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार; काय आहेत निकष? जाणून घ्या

मुंबई : Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाल्याचे चित्र आहे. दरम्यान महायुती सरकारने (Mahayuti Govt) निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. विधानसभेच्या जाहीर झालेल्या निकालात महायुतीला २३० हुन अधिक जागा मिळाल्या आहेत.
या निकालात लाडकी बहीण’ योजनेचे कार्ड चालल्याचे बोलले जात आहे. कारण, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह १५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना आता त्या २१०० रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून ६०० रुपयांची वाढ त्यात होणार असल्याने सध्या महिला खूश आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले. त्यातील २ कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभदेखील मिळाला. आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देणार आहे. तत्पूर्वी, योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. (Ladki Bahin Yojana)
खालील निकषांची पडताळणी होणार:
- योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
- लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
- एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
- परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी