Land Survey News | 1 डिसेंबर पासून जमीन मोजणीच्या दरांमध्ये वाढ; मोजणीसाठीचा कालावधी 6 महिन्यांवरून 3 महिने
पुणे : Land Survey News | १ डिसेंबर पासून जमीन मोजणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे तर जमीन मोजणीसाठीचा कालावधी सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे. आता नियमित आणि द्रुतगती अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळ दोन ठिकाणीच विभागले जाईल.
तर मोजणीची प्रक्रिया केवळ तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाणार आहे. या कालमर्यादेमुळे अधिकाऱ्यांवरही मोजणीचे बंधन राहील. मोजणी वेळेत न झाल्यास संबंधितांवर सेवा हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे भूमिअभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील साध्या मोजणीसाठी पूर्वीच्या दरांमध्ये दुपटीने वाढ करून आता नियमित मोजणी करताना दोन हेक्टरसाठी आता २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर शहरी भागातील शेतजमिनींच्या मोजणीसाठी पूर्वी १० गुंठ्यांसाठी १ हजार द्यावे लागत होते. आता १ हेक्टर अर्थात १०० गुंठ्यांसाठी ३ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
ग्रामीण भागात साध्या मोजणीसाठी पूर्वी २ हेक्टरसाठी १ हजार रुपये द्यावे लागत होते. आता मात्र, २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर त्यापुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी आणखी १ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तर द्रुतगती मोजणी करताना २ हेक्टरसाठी ८ हजार रुपये व त्यापुढील २ हेक्टरसाठी ४ हजार रुपये मोजावे लागतील.
पूर्वीच्या दरांच्या तुलनेत ७ हजारांची बचत होणार आहे.
तब्बल १४ वर्षांनंतर मोजणीचे दर वाढविले असले तरी मोजणीचा कालावधी कमी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भूमिअभिलेख विभागाने दिले आहे.
पूर्वी साधी, तातडीची, अतितातडीची आणि अति-अतितातडीची अशी चार प्रकारात जमीन मोजणी केली जात होती.
त्यामुळे मनुष्यबळ चार ठिकाणी विभागले जात होते. परिणामी मोजणीसाठीचा कालावधी १८० दिवसांचा ठेवण्यात आला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या