Landslide Sinhagad Ghat Road | सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळली; वाहतुकीसाठी रस्ता बंद

Landslide Sinhagad Ghat Road

पुणे : Landslide Sinhagad Ghat Road | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे (Pune Rains). किल्ले सिंहगडावर रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान आता दरड हटवण्याचे काम सुरु असून प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुपार पर्यंत अथवा सायंकाळ पर्यंत दरड हटवण्याचे काम पूर्ण होईल त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता पूर्वरत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्याची घटना रात्री घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. (Sinhagad Fort)

किल्ले सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे सिंहगड परिसरात दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. ज्या ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळली तेथे वन व्यवस्थापन समितीने दरड कोसळण्याच्या शक्यता असून जास्त वेळ थांबू नये असे सूचना फलक देखील लावण्यात आले होते.

सोमवारी मध्यरात्री गड परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर वर ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला आहे.

सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती वनविभाग आणि प्रशासनाला दिली.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून वनव्यवस्थापन समितीतर्फे दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जेसिबीच्या साह्याने दरड हटवली जात असून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
गडावरील वाहनतळापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed