Latur Crime News | खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या पतीने अन् मुलाने डोक्यात कोयत्याचे वार करत संपवलं

लातूर : Latur Crime News | अनैतिक संबंधांतून एका व्यक्तीची डोक्यात कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद प्रल्हाद इंगळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, शरद इंगळे हा खडी केंद्रात मुकादम म्हणून काम करत होता. करकट्टा येथील एका महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पळून गेले होते. दोघांची समजूत काढून त्यांना पुन्हा बोलवण्यात आले होते. दोघांची लग्नही झालेली आहेत. महिलेचा पती मोठा मुलगा आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून शरद इंगळे याचा खून केल्याची माहिती मिळत आहे.
कोयता आणि कत्तीचा गंभीर वार करत शरदचा खून करण्यात आला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.