Laxmi Road Pune Crime News | लक्ष्मी रोडवर भर दिवसा तरुणाला मारहाण करुन लुबाडले; बँकेचा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन पावणे तीन लाख रुपये घेतले काढून
पुणे : Laxmi Road Pune Crime News | ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून बँकेचा पासवर्ड मागितला असता तो देण्यास नकार दिल्याने दोघांनी तरुणाला मारहाण करुन त्याला लुबाडले. त्याच्याकडून बँकेचा पासवर्ड घेऊन २ लाख ६३ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्ष्मी रोडवरील गणेश पेठेतील डुल्या मारुती मंदिरासमोर (Dulya Maruti Chowk Pune) २५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली.
याबाबत एका शिरुर येथे राहणार्या एका २१ वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोघांवर जबरी चोरीला गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यात आले होते. त्यावेळी दोघांनी त्यांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून बँकेचा पासवर्ड मागितला़ तो फिर्यादी यांनी न दिल्याने त्यांनी भर रस्त्यात त्यांना मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या बँक खात्याचा पासवर्ड घेतला. फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट काढून घेऊन त्यातील ए टी एम कार्ड, आधार कार्ड व २० हजार रुपये रोकड घेऊन पळून गेले. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून २ लाख ६३ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत. (Laxmi Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद