Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)
पुणे : Leopard Dive Ghat Pune | सासवड रस्त्यावरील (Saswad Road) दिवे घाटात वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्या रस्ता ओलंडताना दोन दुचाकी चालक थोडक्यात बचावल्याने प्रवाशांमध्ये घबराट झाली. त्याच वेळी कारमधील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. बिबट्या पळत येऊन रस्ता ओलांडत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिवे घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसल्याने तिथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वकडी ग्रामस्थांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्या दिसत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. मात्र, कोणाकडे असा फोटो किंवा चित्रीकरण आढळले नाही. तरीही ग्रामस्थ सावधगिरी बाळून होते.
सासवड कडून वडकीकडे (Saswad To Wadki) येताना घाटाच्या उताराला वडकी पासून तिसऱ्या वळणावर बिबट्या डोंगरावरून उतरुन अचानक झाडांमध्ये जाताना प्रवाशांना दिसला. बिबट्या रस्ता ओलांडत असताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. त्याच वेळी कारमधील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले.
सध्या पावसाळा सुरु असून अनेक जण पर्य़टनासाठी जातात.
बरेच पर्यटक लहान मुलांना घेऊन तेथील धबधबे आणि निसर्ग सौदर्य़ पाहण्यासाठी येत असतात.
अनेकजण सेल्फी घेण्याच्या नादात असतात
. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो,
एकटे न राहता जमावाने रहावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल,
आरोपी गजाआड
Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल