Leopard In Keshavnagar Mundhwa | मुंढव्यातील केशवनगरच्या दाट वस्तीत पुन्हा बिबट्याचे दर्शन; कुंभारवाडा परिसरातील सोसायटीच्या सीसीटीव्हीत पहाटे कैद
पुणे : Leopard In Keshavnagar Mundhwa | मुंढवा येथील केशवनगरमधील अल्कॉन सिल्व्हर लिफ सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता. वन विभागाने दिवसभर शोध घेतल्यानंतरही तो आढळून आला नाही. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांनी एका सोसायटीमध्ये आलेला दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रा अगोदर पळताना दिसतो. त्यानंतर बिबट्या येऊन जाळीतून निघून जाताना दिसतो. कुंभारवाडा या भागात एक शाळाही आहे. शुक्रवारी जेथे हा बिबट्या दिसला तो दाट लोकवस्तीचा भाग आहे.
हा सर्व पट्टा नदी किनार्याला लागून आहे. वन विभागाने गुरुवारी त्याचा शोध घेतला. दिवसा दाट झाडीत लपून बसत असावा. त्याच्या शोधासाठी कर्मचारी तिकडे रवाना झाल्याचे वन अधिकारी राज सुरेश वरक यांनी सांगितले.
