Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

Leopard In Malthan Pune

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Leopard In Malthan Pune | शिरूर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या पटांगणात सोमवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टिमने जेरबंद केले.

मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर सकाळी बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. परंतु काही वेळाने सदर बिबट्या ब-याचवेळ एकाच जागेवर बसून राहील्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनपाल गणेश म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकुड, रेस्क्यू टिम कर्मचारी ऋषिकेश विधाटे, जयेश टेमकर, राजेश वाळुंज, सुदर्शन खराडे, शुभम सिस्तार, सचिन गोडसे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सदर बिबट्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकाच जागी बसून राहिल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू टिमने अंदाजे साडेतीन वर्षे वयाच्या नर बिबट्याला जेरबंद केले. त्याला पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’