Leopard spotted in RIT College in Lohegaon Pune | लोहगावमधील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचे दर्शन; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ; अग्निशमन दल घटनास्थळी पाचारण
पुणे : Leopard spotted in RIT College in Lohegaon Pune | लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावरील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या निदर्शनास पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार (दि.१२) सकाळच्या वेळेला महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग, तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने बिबट्याला पाहिलं. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला. बिबट्या अचानक दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात दाट झाडी आहे. वडगाव शिंदे गावाजवळ इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीपात्रातून बिबट्या महाविद्यालयाच्या परिसरात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
शोध मोहिमेसाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दल आणि वनविभागाच्या पथकाकडून आरआयटी महाविद्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.
बिबट्याचा शोध लागलेला नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांनी दिली. (Leopard spotted in RIT College in Lohegaon Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु