Local Body Elections In Maharashtra | राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ! मुंबई, पुण्यासह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

Local Body Elections In Maharashtra | Schedule of municipal elections in the state announced! Voting for 29 municipalities including Mumbai, Pune on January 15, counting of votes on January 16

मुंबई : Local Body Elections In Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच आजपासून तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. (PMC Elections 2026)

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर

अर्जाची छाननी: 31 डिसेंबर

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: 2 जानेवारी

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी

मतदान: 15 जानेवारी

मतमोजणी/निकाल: 16 जानेवारी

राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली असून, जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाणार असून, ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेली असल्याने त्यातील नावे वगळण्याचा अधिकार राज्य आयोगाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महत्त्वाची आकडेवारी

एकूण मतदार: 3.48 कोटी

एकूण मतदार केंद्र: 39,147

मुंबईतील मतदार केंद्र: 10,111

कंट्रोल युनिट: 11,349

बॅलेट युनिट: 22,000

मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागेल. उर्वरित 28 महापालिकांत एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान करावे लागणार आहे.

उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांनी निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे आवश्यक राहणार आहे.

या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार

बृहन्मुंबई – 227

भिवंडी-निजामपूर – 90

नागपूर – 151

पुणे – 162

ठाणे – 131

अहमदनगर – 68

नाशिक – 122

पिंपरी-चिंचवड – 128

औरंगाबाद – 113

वसई-विरार – 115

कल्याण-डोंबिवली – 122

नवी मुंबई – 111

अकोला – 80

अमरावती – 87

लातूर – 70

नांदेड-वाघाळा – 81

मीरा-भाईंदर – 96

उल्हासनगर – 78

चंद्रपूर – 66

धुळे – 74

जळगाव – 75

मालेगाव – 84

कोल्हापूर – 92

सांगली-मिरज-कुपवाड – 78

सोलापूर – 113

इचलकरंजी – 76

जालना – 65

पनवेल – 78

परभणी – 65

You may have missed