Lohegaon Pune Crime News | जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या मित्रावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा; व्याजाने दिलेले 62 लाख रुपये परत मागितले

women marhan

पुणे : Lohegaon Pune Crime News | व्याजाने पैसे दिले असताना ते परत करण्याविषयी वारंवार मागणी करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप एका महिलेने केले असून येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) तरुणावर अ‍ॅट्रासीटीबरोबर (Atrocity Act) बेकायदा सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र राजेंद्र राजगुरु Ravindra Rajendra Rajguru (रा. नवी खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोहगावमधील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवड्यामध्ये मार्च २०२० ते सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा तोंड ओळखीचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांना व्याजाने पैसे दिले होते. त्याचे मुद्दल व व्याज असे एकूण ६२ लाख रुपये झाले आहेत. या पैशांची वारंवार मागणी करुन फिर्यादी यांना हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. त्यांच्या पाठीवरुन हात फिरवून त्यांच्याशी अश्लिल चाळे केले. त्यांच्या जातीवरुन जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी यांना तू लय मोठी झाली आहे का असे म्हणून दुकानाची चावी मागून सतत व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonawane) तपास करीत आहेत. (Lohegaon Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed