Lohegaon Pune Crime News | विमानात सिगारेट ओढणार्‍या प्रवाशाला अटक ! इंडिगो विमानात घडला प्रकार

indigo

पुणे : Lohegaon Pune Crime News | इंडिगो विमानाच्या (Indigo Airlines) स्वच्छतागृहात सिगारेट पिणाऱ्या प्रवाशाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. नक्षब जहांगिर (वय ३८, रा. रोझ अपार्टमेंट, ओखला विहार, नवी दिल्ली) असे या प्रवाशाचे नाव आहे. विमानात जाण्यापूर्वी प्रवाशांची संपूर्ण तपासणी होते. या तपासणीला चुकवून त्याने लायटर बरोबर बाळगल्याचे आढळून आले.

याबाबत इंडिगो एअरलाईनचे सिक्युरिटी एक्सिक्युटिव्ह प्रतिक पावले (रा. विश्रांतवाडी) यांनी लोहगाव विमानतळ पोलिसांकडे (Viman Nagar Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामध्ये सिगारेट ओढण्यास मनाई (No Smoking Zone) आहे. तशी उदघोषणा विमान सुटण्यापूर्वी केली जाते. दिल्लीहून पुण्याकडे इंडिगो फ्लाईट नं २६१८ येत होते. विमान हवेत असताना विमानाच्या वॉशरुममध्ये नक्षब जहांगिर हे सिगारेट ओढत होते. केबिन अटेंडन्ट गिनी सचदेव व निलीमा यांना तो सिगारेट ओढताना मिळून आला. त्यांनी कॅप्टनला ही माहिती दिली. त्यानंतर कॅप्टनने तसा मेसेज पुणे विमानतळावरील सिक्युरिटी मॅनेजर तुषार अंधारे यांना दिला. पुणे विमानतळावर सोमवारी रात्री एक वाजता विमान उतरले. त्यानंतर फिर्यादी व पोलीस विमानात गेले. त्यांनी जहांगिर याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये लाईटरही आढळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करीत आहेत. (Lohegaon Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed