Lohiya Nagar Pune Crime News | भांडणे सोडविण्यास गेलेल्या आजोबांना मारहाण; लोहियानगरमधील घटना

marhan

पुणे : Lohiya Nagar Pune Crime News | मुलांमध्ये भांडणे सुरु असताना ती सोडविण्यासाठी गेलेल्या अजोबांना मारहाण (Marhan) करण्याचा प्रकार समोर आला आहे. तर, दुसर्‍या तक्रारीत मुलांनी वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे.

याबाबत अरुण शंकर गायकवाड (वय ६५, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित थोरात, सुनिल थोरात व प्रथमेश थोरात (रा. लोहियानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहियानगरमधील गल्ली नं. १ मधील रोडवर बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजता घडला. (Attack On Grandfather)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातू तुषार गायकवाड व रोहित थोरात यांच्यात भांडणे चालू होती. ती पाहून अरुण गायकवाड हे भांडणे सोडविण्यासाठी गेले. तेव्हा रोहित थोरात याने फिर्यादींना तू मध्ये का येतो, असे म्हणून त्याच्या हातातील ठणक वस्तू फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच प्रथमेश व सुनिल थोरात यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्याविरोधात प्रथमेश थोरात (वय २१, रा. लोहियानगर) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर गायकवाड, साहील गायकवाड, भारत गायकवाड, तुषार गायकवाड (सर्व रा. लोहियानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा भाऊ रोहित थोरात व तुषार गायकवाड यांच्यामध्ये भांडणे चालू होती.

ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचे वडिल सुनिल थोरात हे गेले.
ते भांडणे सोडवून घरी जात असताना सागर गायकवाड व इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
करुन फरशी व सिमेंट ब्लॉकनी फिर्यादी व त्यांचे वडिलांना डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. पोलीस हवालदार येलपले तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed