Lok Adalat | लोकअदालतीमध्ये नवा इतिहास ! अभियंत्याच्या कुटुंबाला 4 कोटी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई

Lok Adalat

ठाणे : Lok Adalat | लोक अदालतीमध्ये एक नवा इतिहास घडला आहे. अमेरिकेत जाण्याच्या तयारी असलेल्या अभियंत्याचा टँकरच्या धडकेत मृत्यु झाला होता. या अभियंत्याच्या कुटुंबाला खासगी इन्शुरन्स कंपनीकडून साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात लोक अदालतीत यश आले.

https://www.instagram.com/p/DAf3hZXCY4k

अपघातात मृत्यु पावलेली व्यक्ती ही व्यवसायाने संगणक अभियंता होती. ती कांजुरमार्ग येथील एका खासगी कंपनीत कामाला होती. काही दिवसांनी हा अभियंता याच कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयात रुजू होणार होता. मात्र, नावडा फाटा येथे ९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरुन जात असताना टँकरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला होता. मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती एस एन शाह (Judge S N Shah) यांच्या कोर्टात शनिवारी हा दावा निकाली काढण्यात आला.

https://www.instagram.com/p/DAgQsNZCg7H

लोकन्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर (Judge A. N. Sirsikar) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रक्कमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

https://www.instagram.com/p/DAftoa6ijMf

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी सांगितले की, साडेचार कोटींची भरपाई पीडिताच्या कुटुंबीयांना मिळवून देण्यात इन्शुरन्स कंपनी, अर्जदार यांच्या सहकार्यामुळे यश आले. ठाणे लोक अदालतीमध्ये असलेला उत्साह टिकवून ठेवणे सोपी गोष्ट नाही.

https://www.instagram.com/p/DAfmi6JCyr2

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)