Lok Adalat News | घाटंजी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 236 प्रकरणे निकाली

घाटंजी : Lok Adalat News | घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत एकूण २३६ वादपुर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. तसेच घाटंजी तालुक्यातील ५१ वादपुर्व प्रकरणे व एकूण १८५ प्रलंबित प्रकरणे असे एकूण २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. वादपुर्व प्रकरणांचे तडजोड मुल्य ८८ लाख ९६ हजार ७६८ रुपये व प्रलंबित प्रकरणाचे तडजोड मुल्य २२ लाख १२ हजार ४५७ रुपये होते.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायालय क्रंमाक १ दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात, न्यायालय क्रंमाक २ सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर उपस्थित होते. या वेळी घाटंजी न्यायालयातील वकील मंडळी, पक्षकार, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी आदीं उपस्थित होते.
राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर (यवतमाळ), सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ‘राष्ट्रीय लोक अदालतीचे’ आयोजन करण्यात आले. घाटंजी येथील लोक अदालतीची सुरवात ज्येष्ठ पक्षकार, महीला पक्षकार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन न्यायालयाच्या हद्दीतील रोपांना पाणी देऊन करण्यात आले.
या वेळी घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायालय क्रंमाक १ दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी उपस्थित पक्षकारांना लोक अदालतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच घाटंजी येथील लोक अदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रकरणे मिटविण्यासाठी घाटंजी येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायालय क्रंमाक १ दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात, न्यायालय क्रंमाक २ सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर तसेच घाटंजी तालुक्यातील विधीज्ञ मंडळी आदींनी प्रयत्न केले. या वेळी घाटंजी शहर व घाटंजी तालुक्यातील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालत यशस्वी करण्यासाठी घाटंजी न्यायालयातील कर्मचारी वृंद, घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे, दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, विविध बॅंका तसेच पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
पुढील राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन १० मे २०२५ रोजी होत असून या लोक अदालतीत सुद्धा जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश अतुल अरुण उत्पात यांनी केले आहे.