Lonavala Crime News | जीव धोक्यात घालून पर्यटन ! लोणावळ्यात २६ पर्यटकांवर गुन्हे
लोणावळा : Lonavala Crime News | मावळ (Maval Taluka) व मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) पर्यटन स्थळांवर जाण्यास २५ जुलै ते २९ जुलै दरम्यान प्रशासनाने बंदी घातली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने ही बंदी २७ जुलैच्या मध्यरात्रीनंतर उठवली होती. त्यानंतर पुन्हा हवामान विभागाने पुढील चार दिवस पुणे जिल्ह्यात व घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट दिल्याने पुन्हा बंदीचा नवीन आदेश प्रांत अधिकारी यांनी लागू केला. (Lonavala Crime News)
दरम्यान रविवारी (दि.२८) पावसाचा जोर कमी असल्याने व पर्यटक देखील मोठ्या संख्येने आल्याने सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी वर्षाविहाराचा मनमुराद आनंद घेतला. भुशी धरणाप्रमाणे (Bhushi Dam) सहारा पुल धबधबा (Sahara Waterfall Lonavala), टायगर पॉईंट (Tiger Point Lonavala), खंडाळा येथील राजमाची पॉईंट (Rajmachi Point Lonavala) या सर्व परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
धबधब्याच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हुल्लडबाजी करून जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांविरुद्ध कारवाईचा आदेश पोलिसांना दिला आहे. लोणावळा, खंडाळा (Khandala) परिसरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन करून लोणावळ्यातील सहारा पुलासमोरील (Sahara Bridge Waterfall Lonavala ) धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या चार वेगवेगळ्या गटांतील २६ पर्यटक तरुणांविरुद्ध लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) रविवारी गुन्हा दाखल केला. प्रतिबंधात्मक आदेश भंग केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम २२३ अन्वये रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेले पर्यटक तरुण मुंबई, मावळ, मुळशी, शिक्रापूर, शिरूर, चाकण, खेड,
पुणे शहर परिसरातील आहेत. याबाबत पोलीस नाईक हनुमंत शिंदे आणि रईस मुलाणी
यांनी स्वतंत्र फिर्याद दाखल केल्या असून, पोलीस निरीक्षक सुहास जगताप (PI Suhas Jagtap) तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु