Lonavala Double Murder | लोणावळा: फिरायला गेलेल्या तरुणांची हात-पाय बांधून हत्या; 7 वर्षानंतर आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष सुटका
लोणावळा : Lonavala Double Murder | सात वर्षांपूर्वी घडलेल्या लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणात कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने आरोपी सलीम शब्बीर शेखची (Salim Shabbir Shaikh) निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्या अभावी शब्बीर शेखची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता. चोरीसाठी दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र चोरीचे आरोपच सिद्ध न झाल्याने कोर्टाने आरोपीची सुटका केली आहे.
दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी अडीच महिन्यानंतर सलीम शेख आणि आसिफ शेख या दोघांना अटक केली होती. दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची तेव्हाच मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर सात वर्षांनी सलीम शेखला कोर्टात हजर केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र चोरीचा आरोप सिद्ध न झाल्याने सलीम शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
३ एप्रिल २०१७ रोजी ही घटना घडली होती. लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये (Sinhgad College Lonavala) शिकणारे सार्थक वाकचौरे (Sarthak Wakchaure) आणि श्रुती डुंबरे (Shruti Dumbre) हे दोघेही भुशी धरणाच्या (Bhushi Dam) मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमध्ये फिरायला गेले होते. त्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले. दोघांनाही विवस्त्र करुन त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला होता. दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. तपासा दरम्यान पोलिसांच्या खबऱ्याने यातील एका आरोपीने दारुच्या नशेत काही जणांकडे हत्येची कबुली दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अडीच महिन्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिली होती.
आसिफ आणि सलीम यांनी दोघांना एका निर्जन स्थळी पाहून त्यांच्याकडे आक्षेप घेत चौकशी सुरु केली.
मात्र आपण इथून लवकर निघणार असल्याचे सार्थकने सांगितल्यावर ते दोघे निघून गेले. मात्र पाच मिनिटांनी पुन्हा आहे.
त्यांनी सार्थक आणि श्रुतीला जवळच्या झुडपात नेले.
त्यानंतर तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आरोपीने आधी सार्थकला कपडे काढण्यास भाग पाडले आणि श्रुतीला मागे नेले.
सार्थकने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी झालेल्या मारहाणीत सार्थकचा मृत्यू झाला.
श्रुतीने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपींनी तिलाच संपवण्याचं ठरवलं.
आरोपींची कपड्याच्या साह्याने श्रुतीचे हात बांधले आणि दगडाने ठेचून तिची हत्या केली.
या घटनेनंतर आरोपींनी दोन मोबाईल फोन आणि एक हजार रुपये रोख घेऊन पळ काढला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश