Lonavala Pune Crime News | मृत्यु पावलेल्या महिलेच्या नावाने हमी पत्र देऊन केले जमीन खरेदी खत; सम्राट अशोक क्लब आणि रेसार्टसचे अशोक खिवंसरा विरुद्ध लोणावळ्यात गुन्हा दाखल
पुणे : Lonavala Pune Crime News | १० वर्षापूर्वी निधन झालेल्या महिलेच्या नावाने हमी पत्र देऊन कुलमुख्यत्यार पत्र घेऊन त्याद्वारे जमीनचे खरेदीखत केल्याप्रकरणी सम्राट अशोक क्लब आणि रेसार्टसचे (Samrat Ashok Club and Resorts) संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cheating Fraud Case)
अशोक मिश्रीलाल खिवंसरा Ashok Misrilal Khivansara (रा. मोदीबाग, गणेशखिंड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक बापू जमदाडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरसोली येथील गट न ११३/२ क्षेत्र ४ हेक्टर असून या मिळकतीचा हस्ते सत्यवती बैजनाथ गुप्ता, शिलावती वधाराम गुप्ता, ब्रिजराणी रामप्रसाद गुप्ता यांच्यातर्फे कुलमुख्यत्यारधारक प्रकाश संपतकुमार दुगड आणि अशोक मिश्रीलाल खिवंसरा यांनी सम्राट अशोक क्लब्स आणि रेसार्टसचे संचालक अशेक मिश्रीलाल खिंवसरा यांना लिहून दिला. हा दस्त नोंदणी १ डिसेबर २००७ रोजी करण्यात आले होते.
याबाबत सुरेश मांगीलाल जैन तर्फे कुलमुखत्यार धारक निशा प्रकाश रखयानी (रा. पिंपरी) यांनी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. दुय्यम निबंधक कार्यालयाने सर्वांना नोटीसा पाठवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. खिवंसरा यांनी सादर केलेले म्हणणे संयुक्तिक वाटत नसल्याने निबंधक कार्यालयाने चौकशी सुरु केली.
त्यातील शिलावत वधाराम गुप्ता यांचे निधन १३ नोव्हेबर १९९७ रोजी मुंबईत झाले होते. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांच्या नावाने खोटे हमी पत्र तयार करुन जोडले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार फिर्याद देण्यात आली असून लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर